आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams An Sara Irani In Final For French Open Tennis

सेरेना, सारा सेमीफायनलमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- अव्वल मानांकित सेरेना विल्यम्स व इटलीची सारा इराणी यांच्यात फ्रेंच ओपनची उपांत्य लढत रंगणार आहे. अमेरिकेच्या सेरेनाने मंगळवारी उपांत्यपूर्व लढतीत शानदार विजय मिळवला. तिने रशियाच्या स्वेतलाना कुज्नेत्सोवाचा पराभव केला. तिने रोमांचक लढतीत 6-1, 3-6, 6-3 अशा फरकाने विजय मिळवला. दुसरीकडे पाचव्या मानांकित सारा इराणीने उपांत्यपूर्व लढतीत अग्निझस्का रांदावस्काचा पराभव केला. इटलीच्या खेळाडूने सामन्यात 6-4, 7-6 अशा फरकाने विजय मिळवला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सेरेना विल्यम्सला विजयासाठी मोठी झुंज द्यावी लागली. तिने सुरेख सर्व्हिस करताना पहिला सेट अवघ्या 28 मिनिटांत जिंकला. तिने 6-1 अशा फरकाने पहिला सेट जिंकून लढतीत आघाडी घेतली. मात्र, तिला ही आघाडी दुसर्‍या सेटवर कायम ठेवता आली नाही. रशियाच्या खेळाडूने दमदार पुनरागमन करताना दुसरा सेट 6-3 ने जिंकला. यासह तिने लढतीत बरोबरी साधली. ही लढत तब्बल 43 मिनिटे रंगली. त्यानंतर तिसर्‍या सेटमध्ये सेरेनाने आक्रमक सर्व्हिस करून दमदार सुरुवात केली. तिने 46 मिनिटांच्या रंगतदार लढतीत तिसरा सेट जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे पाचव्या मानांकित सारा इराणीनेही आपला विजय निश्चित केला. तिने रांदावस्काला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. मात्र, इटलीच्या खेळाडूला मोठी कसरत करावी लागली. रांदावस्काने दुसर्‍या सेटमध्ये चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही खेळाडूंनी अटीतटीची खेळी करून हा सेट ट्रायब्रेकरपर्यंत खेचला. अखेर, 67 मिनिटे झुंज देणार्‍या साराने दुसरा सेट जिंकून अंतिम चारमध्ये धडक मारली.

सानिया-बेथानी बाहेर
सानिया मिर्झा व अमेरिकेची बेथानी माटेक-सँडला मंगळवारी तिसर्‍या फेरीत दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. या जोडीचा सामना रशियाच्या अनास्तासिया पावल्युचेंको व चेक गणराज्यची लुसी सफारोवासोबत सामना झाला. सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये अनास्तासिया-लुसीने 7-6 ने बाजी मारली होती. दुसर्‍या सेटमध्ये 3-5 ने पिछाडीवर असलेल्या सानिया-बेथानीने माघार घेतली.