आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनाचे अनोखे ‘अर्धशतक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माद्रिद - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सने 18 वर्षाच्या टेनिस करिअरमध्ये एकेरीच्या विजेतेपदाचे अर्धशतक पूर्ण केले. तिने रविवारी माद्रिद ओपनचे अजिंक्यपद पटकावले. तिचा हा करिअरमधील 50 वा चषक ठरला. यामध्ये 15 ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा समावेश आहे. सेरेनाने अंतिम सामन्यात रशियाच्या मारिया शारापोवाचा पराभव केला. तिने 75 मिनिटांत 6-1, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला. या विजयासह सेरेनाने जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानही कायम ठेवले. तिने तब्बल दहा वर्षांनंतर क्ले कोर्टवर पहिला किताब पटकावला.

शारापोवाची संधी हुकली
पराभवाने शारापोवाची जगातील नंबर वन टेनिसपटू होण्याची संधी हुकली. तिला सेरेनाने धूळ चारली. रशियाची खेळाडू सध्या जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानी आहे.

ब्रायन बंधू दुहेरीत चॅम्पियन
अमेरिकेच्या माइक व बॉब या ब्रायन बंधूंनी माद्रिद ओपनमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. या जोडीने फायनलमध्ये अलेक्झेंडर पेया व ब्रुनो सोरेसचा 6-2, 6-3 ने पराभव केला.

नदाल तिसर्‍यांदा चॅम्पियन
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या राफेल नदालने तिसर्‍यांदा माद्रिद ओपनचा चषक जिंकला. त्याने यापूर्वी, 2005 व 2010 मध्ये माद्रिद ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. त्याने रविवारी पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात स्वित्झर्लंडच्या स्टेनलिस वावरिंकाचा पराभव केला. त्याने 71 मिनिटांत सामना 6-2, 6-4 अशा फरकाने जिंकला. यासह स्पेनच्या नदालने यंदाच्या सत्रात पाचवे विजेतेपद आपल्या नावे केले.