लंडन - वर्ल्ड चॅम्पियन स्पेनचा अग्रमानांकित
राफेल नदाल, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर, रशियाची मारिया शरापोव्हा यांनी येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रॅडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीच्या चौथ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, अमेरिकेच्या अव्वल सेरेना विल्यम्सला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. फ्रान्सच्या एलाइज कार्नेटने 1-6, 6-3, 6-4 अशा फरकाने सेरेनाला पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला.
नदाल आणि फेडररचे विजयी अभियान सुरु
राफेल नदालने कझाकिस्तानच्या कुकूशकीनचा 6-7, 6-1, 6-1, 6-1 असा पराभव केला. तर फेडररने कोलंबियाच्या सॅटियागो गिराल्डोला 1तास 21 मिनिटांच्या लढतीमध्ये 6-3, 6-1, 6-3 अशा फरकाने पराभूत केले.
शारापोव्हाने केला रिस्केचा पराभव
रशियाच्या मारिया शरापोव्हाने अमेरिकेच्या ऍलिसन रिस्केवर 6-3, 6-0 अशी मात करत चौथी फेरी गाठली.
पुढील स्लाइडवर पाहा, विम्बल्डनमधील स्पर्धकांची छायाचित्रे..