आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या NO.1 स्‍टार सेरेना विल्यिम्‍सची LOVE लाईफ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी फ्रेंच ओपनमध्‍ये मारिया शारापोव्‍हाचा पराभव, मग यूएस ओपनमध्‍ये माजी नंबर 1 खेळाडू व्हिक्‍टोरिया अजारेंकाला पराभूत करणा-या सेरेना विल्यिम्‍सने यशाचे श्रेय आपल्‍या नव्‍या प्रेमाला दिले आहे. प्रशिक्षक पॅट्रिक मोर्ताग्‍लूबरोबर डेटिंग करीत असलेली सेरेना आपल्‍याला मिळत असलेल्‍या यशाचे सर्व श्रेय त्‍यांनाच देते.

सेरेना 32व्‍या वाढदिवसाच्‍या काही दिवस आधी यूएस ओपन किताब जिंकणारी सर्वात प्रौढ खेळाडू ठरली आहे. वर्षाच्‍या सुरूवातीला तिने डब्‍ल्‍यूटीए रॅकिंगमध्‍ये नंबर 1 पदावर येऊन नवीन विक्रम प्रस्‍थापित केला होता.

व्‍यावसायिक ते वैयक्तिक आयुष्‍यापर्यंत सेरेनाने स्‍वत:ला चर्चेत ठेवले आहे. तिच्‍या सातत्‍याने बदलणा-या मित्रांवरूनही अनेक वाद झाले. तिची प्रतिस्‍पर्धी असलेलल्‍या मारिया शारापोव्‍हाचा मित्र ग्रेगरी दिमित्रोव पूर्वी सेरेनाचा डेटिंग पाटर्नर राहिलेला आहे. यावरूनही दोघांमध्‍ये अनेकवेळा शेरेबाजी झाली आहे.

आज आम्‍ही तुम्‍हाला दाखवत आहोत सेरेनाच्‍या लव्‍ह लाईफची काही छायाचित्रे. हे सर्व फोटो तिनेच सोशल नेटवर्किंग साईट्सवर पोस्‍ट केली होती. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, सेरेना विल्यिम्‍सच्‍या वैयक्तिक आयुष्‍याचा लव्‍ह ग्राफ...