आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँडी मरे, सेरेना विल्यम्सची सेमीफायनलमध्ये धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - तिसरा मानांकित इंग्लंडच्या अँडी मरेने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमला पराभूत करून पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. महिला गटात जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्सनेसुद्धा उपांत्य फेरीत धडक दिली आहे. सेरेनाने बुधवारी डब्ल्यूटीए कारकीर्दीतील ७०० वा विजय मिळवला.
अशी कामगिरी करणारी सेरेना विल्यम्स जगातली आठवी खेळाडू ठरली आहे. या क्लबमध्ये मार्टिना नवरातिलोवा (१४४२) नंबर वनच्या सिंहासनावर कायम आहे. अँडी मरे आणि थिएम यांच्यात झालेल्या क्वार्टर फायनल सामन्यात मरेने विजय मिळवून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. मरेने डॉमिनिकवर ३-६, ६-४, ६-१ ने मात केली. आता त्याचा सामना चेक गणराज्यचा टॉमस बर्डिचसोबत होईल. यासह मरेने कारकीर्दीतील ५०१ वा विजय साजरा केला.