आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना विल्यम्स रंगली प्रेमाच्या रंगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - गेल्या 13 महिन्यांत मिळालेल्या यशात प्रेमाचे महत्त्वपूर्ण योगदान ठरले आहे. अमेरिकन ओपन टेनिस स्पध्रेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावणार्‍या सेरेना विल्यम्सने मीडियाशी बोलताना या भावना व्यक्त केल्या. प्रत्येकाच्या जीवनात प्रेम असलेच पाहिजे, असे मला वाटते. मी यातील काही तज्ज्ञ नाही. मात्र, प्रेमामुळे आपले जीवनच बदलून जाते, असे ती म्हणाली.

विशेष म्हणजे जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू आणि आपल्या शानदार खेळाने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकणारी सेरेना सध्या आपले फ्रान्सिसी कोच पॅट्रिक मोरोटोग्लूच्या प्रेमात पडली आहे. बर्‍याच वेळा सेरेना पॅट्रिकच्या हातात हात घालून फिरताना आणि स्टेडियममध्ये एकत्र सामन्याचा आनंद लुटताना दिसली. स्वत: सेरेनाला सार्वजनिकरीत्या आपल्या पहिल्या प्रेमाची कबुली देण्यास संकोच वाटला नाही.

शारापोवा झाली नाराज
काही दिवसांपूवी सेरेना आणि माजी नंबर वन खेळाडू रशियाची मारिया शारापोवा आपल्या बॉयफ्रेंडमुळे समोरासमोर आल्या होत्या. पॅट्रिकचे सुखी कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा आरोपसुद्धा शारापोवाने सेरेनावर लावला. मात्र, सेरेना आपला कोच पॅट्रिकच्या प्रेमात इतकी बुडाली आहे की तिने तर चक्क फ्रेंच भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे.
डेव्हिस चषकात खेळल्याने मला नंबर बनण्यासाठी मदत होणार नाही. मात्र, तरीही मी या स्पध्रेत खेळेन. आमच्या संघाला जागतिक गटात स्थान मिळवण्यासाठी मी मदत करीन. - राफेल नदाल


टेनिसवरच खरे प्रेम
असे असले तरीही मी टेनिसच्या प्रेमात आहे, असे 17 वेळेस गँड्रस्लॅम विजेत्या सेरेनाने म्हटले. या महिन्यात वयाची 32 वष्रे पूर्ण करणारी सेरेना यूएस ओपन जिंकणारी जगातली सर्वाधिक वयस्क महिला खेळाडू ठरली. टेनिसशी आपले संबंध तुटणे शक्य नाही, असे तिने स्पष्ट केले. ‘मी कधीही वयाचा विचार करीत नाही आणि स्वत: थांबण्याच्यासुद्धा विचारात नसते. मी नजीकच्या भविष्यात निवृत्तीबाबत विचारात नाही, हे मी स्पष्ट करू इच्छिते. मी काही लक्ष्य ठरवले आहे. ते मला गाठायचे आहे,’ असेही अमेरिकेच्या या स्टार खेळाडूने म्हटले.
0 गेल्या 13 महिन्यांत मिळालेल्या यशात प्रेमाचे महत्त्वपूर्ण योगदान ठरल्याचे सेरेनाचे मत
0 आपला कोच पॅट्रिक मोरोटोग्लूच्या प्रेमात सेरेना विल्यम्स; सेरेनाकडून प्रेमाची जाहीर कबुली