आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams Into Miami Open Final After Beating Simona Halep

सेरेनाची मियामीच्या फायनलमध्ये धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी - जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या सेरेना विल्यम्सने तिचा बहरातील फॉर्म कायम राखत शुक्रवारी मियामी ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीसह रंगलेल्या उपांत्य सामन्यात सेरेनाने अनुभवाच्या बळावर रोमानियाच्या सिमोना हालेपवर तीन सेटमध्ये विजय मिळवला.
पहिल्या सेटपासून सेरेनाने वर्चस्व गाजवण्यास प्रारंभ केला. पहिला सेटदेखील ६-४ असा जिंकला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये सिमोनाने जबरदस्त संघर्ष करत सेरेनाकडून सेट ४-६ असा हिसकावून घेतला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये सेरेनाने अखेरच्या टप्प्यात ७-५ असा जिंकत फायनलमध्ये प्रवेश केले. अंतिम सामन्यात सेरेनाचा मुकाबला स्पेनच्या कार्ला सुआरेझ नोवारो हिच्याशी होणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कार्लाने जर्मनीच्या एंड्रिया पेत्कोविकला ६ -३ , ६- ३ ने पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.
योकोविक विजयी

सर्बियाचा टेनिसपटू नोवाक योकोविकने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या डेव्हिड फेररला ७ - ५ , ७ - ५ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. जॉन इस्नरने चौथ्या मानांकित जपानच्या निशिकोरीला ६ -४, ६ - ३ असे पराभूत करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.