आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेनाचे पॅकअप; कार्नेट चौथ्या फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - जगातील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्सचे रविवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. महिला एकेरीच्या तिसर्‍या फेरीत फ्रान्सच्या अलिझे कार्नेटने धूळ चारली. लढतीत 25 व्या मानांकित कार्नेटने 1-6, 6-3, 6-4 अशा फरकाने सनसनाटी विजय मिळवला. यासह तिने चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.

सेरेनाने पहिल्या सेटमध्ये 6-1 ने बाजी मारून आघाडी मिळवली. मात्र, फ्रान्सच्या खेळाडूने दुसर्‍या सेटमध्ये पुनरागमन केले. तिने शानदार खेळीचे प्रदर्शन करून 6-3 ने दुसरा सेट जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर कार्नेटने आक्रमक सर्व्हिसची लय निर्णायक आणि तिसर्‍या सेटमध्येही कायम ठेवली. दरम्यान, सेरेनाने या सेटमध्ये पुनरागमनाचा बराच प्रयत्न केला. मात्र, तिचा हा प्रयत्न फारसा यशस्वी होऊ शकला नाही. फ्रान्सच्या खेळाडूने 6-4 ने तिसरा सेट जिंकून सामना आपल्या नावे केला आणि तिने सेरेनाला बाहेरचा रस्ता दाखवला.

अँजेलिक केर्बर विजयी
एकेरीच्या तिसर्‍या फेरीत अँजेलिक केर्बरने रोमांचक विजय मिळवला. बेल्जियमच्या के. फ्लिपकेन्सचा 3-6, 6-3, 6-2 ने पराभव करत तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला.

हालेपची बेनसिसवर मात
स्पध्रेची तिसरी मानांकित महिला खेळाडू सिमोना हालेपने एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. तिने तिसर्‍या फेरीत स्वित्झर्लंडच्या बी. बेनसिसवर मात केली. तिने सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-1 ने सामना जिंकला. यासह बेनसिसला बाहेर पडावे लागले.

सानिया-काराचा पराभव
चौथ्या मानांकित सानिया मिर्झा आणि कारा ब्लॅक या जोडीचे महिला दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. या जोडीला दुसर्‍या फेरीत ए.पावलुचेंकोवा आणि लुसिया सफरोवाने पराभूत केले. या बिगरमानांकित जोडीने 2-6, 7-6, 6-4 अशा फरकाने सामन्यात रोमांचक विजय मिळवला. पराभवासह सानिया-काराला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.