आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्‍ट्रेलियन ओपनः सेरेना विलियम्‍सचा धक्‍कादायक पराभव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबोर्न- ऑस्ट्रिलियन ओपन टेनिस स्‍पर्धेत पाच वेळा विजतेपद मिळविणा-या सेरेना विलियम्‍सचा खळबळजनक पराभव झाला. अमेरिकेच्‍या नवख्‍या स्‍लोआन स्टिफन्‍स हिने तिचा उपांत्‍यपूर्व फेरीत पराभव केला. त्‍यामुळे सेरेना विल्यम्सचे सहाव्यांदा जेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले आहे.

सेरेना विलियम्‍सला काही महिन्‍यांपासून घोटा आणि पाठीच्या दुखण्याने त्रस्‍त केले आहे. या स्‍पर्धेतही दुखापत घेऊनच खेळली. परंतु, सेरेनाला स्टिफन्सने या लढतीत चांगलीच झुंज दिली. सेरेनाने पहिला सेट जिंकला होता. परंतु, दुसरा सेट स्टिफन्‍सने जिंकला. त्‍यानंतर तिस-या सेटमध्‍ये सेरेनाची सर्व्हिस भेदून सेटसह सामनाही जिंकला. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या सामन्यात स्टिफन्सने सेरेनाचा ३-६, ७-५, ६-४ असा पराभव करत पुढची फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत स्टिफन्सची लढत गतविजेत्या व्हिक्‍टोरिया अझारेंकाशी होणार आहे.