आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams Ousted In French Open 2014 Second Round

फ्रेंच ओपन : सेरेना विल्यम्सचे स्पेनची 20 वर्षीय गार्बिनेकडून 64 मिनिटांत पॅकअप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - जगातील नंबर वन सेरेना विल्यम्सला बुधवारी अनपेक्षित पराभवामुळे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. यासह अव्वल मानांकित सेरेनाचे अवघ्या 64 मिनिटांत आव्हान संपुष्टात आले. स्पेनच्या 20 वर्षीय गार्बिने मुगुरुझाने अमेरिकेच्या सेरेनावर सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-2 असा सनसनाटी विजय मिळवला.
स्पेनची युवा खेळाडू गार्बिनेने दमदार सुरुवात करताना दोन ऐस, 12 विनर्स मारून विजयश्री खेचून आणली. सेरेनाची तीन ऐस, 8 विनर्सची खेळी व्यर्थ ठरली.
दुसरीकडे जगातील माजी नंबर वन व्हीनस विल्यम्स स्लोव्हाकियाच्या अ‍ॅना स्चिमिइल्डोवाने पराभूत केले. व्हीनसला 6-2, 3-6, 5-6 ने पराभवाला सामोरे जावे लागले.

सारा इराणी विजयी : दहाव्या मानांकित सारा इराणीने सलामी सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसनवर 7-5, 3-6, 6-1 ने विजय मिळवला. तसेच माकारोवाने शैल्बी रॉजर्सवर 6-2, 6-3 ने मात केली. लुसी सफारोवाने लग्जमबर्गच्या मॅडी मिनेलाचा 6-3, 7-5 ने पराभव केला.

यांकोविकची विजयी : सहाव्या मानांकित येलेना यांकोविकने विजयी सलामी दिली. तिने कॅनडाच्या शैरनीला 5-7, 6-1, 6-3 अशा फरकाने धूळ चारली.