आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेनाचे 18 वे ग्रॅंडस्‍लॅम विजेतेपदाचे स्‍वप्‍न भंगले, अ‍ॅना इव्हानोविककडून पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न येथे सुरु असलेल्‍या ऑस्‍ट्रेलियन ओपन टेनिस स्‍पर्धेत आज सर्बियाच्‍या एना इवानोविचने सेरेना विल्‍यम्‍सचा धक्‍कादायक पराभव केला.

जागतिक क्रमवारीतील पहिल्‍या क्रमांकाच्‍या सेरेनाचा, अ‍ॅना इव्हानोविकने तीन सेटमध्‍ये पराभव केला आहे. या पराभवामुळे तिचे 18 व्‍या ग्रॅडस्‍लॅम विजेतेपदाचे स्‍वप्‍न धुळीस मिळाले आहे.

अ‍ॅना इव्हानोविक सोबत झालेल्‍या सामन्‍यामध्‍ये सेरेनाने पहिला सेट 6-4 असा जिंकला होता. मात्र दुस-या सेट मध्‍ये 6-3 अशा फरकाने इव्हानोविकने शानदार पुनरागमन केले. निर्णायक तिस-या सेटमध्‍ये अ‍ॅना इव्हानोविकने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत 6-3 अशा फरकाने सेरेनावर मात केली.

जागतिक क्रमवारीत अ‍ॅना 14 व्‍या स्‍थानी आहे. या सामन्‍यात सेरेनाने 31 चूका केल्‍या. सेरेनाने नेटजवळील 10 गुण शुल्‍लक चूकांमुळे गमावले. सेरेनाच्‍या चुकांचा फायदा घेत इव्हानोविकने त्‍याचे रुपांतर विजयात केले.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि बघा सेरेनाच्‍या धक्‍कादायक पराभवाचे छायाचित्रे...