आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams, Rafel Nadal Won In Franch Open Tennis Competition

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत सेरेना, नदाल, फेररची आगेकूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- चौथा मानांकित डेव्हिड फेरर, स्पेनचा राफेल नदाल आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत रविवारी आगेकूच केली. फेरर व सेरेनाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. दुसरीकडे नोवाक योकोविकने चौथ्या फेरीत धडक मारली. राफेल नदालने तिसर्‍या फेरीत इटलीच्या फेबियो फोगनिनीवर मात केली. त्याने 7-6, 6-4, 6-4 ने सामना जिंकून चौथी फेरी गाठली.

31 वर्षीय फेररने दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनवर एकतर्फी विजय मिळवला. त्याने लढतीत 6-3, 6-1, 6-1 अशा फरकाने विजय मिळवला. कोणताही सेट न गमावता त्याने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. सर्वाधिक वेगवान सर्व्हिस करणार्‍या अँडरसनचा या सामन्यात फार काळ निभाव लागला नाही.

कुज्नेत्सोवा सहज विजयी
2009 ची चॅम्पियन स्वेतलाना कुज्नेत्सोवाने तीन सेटमध्ये शानदार विजय मिळवला. तिने आठव्या मानांकित एंजेलिक केर्बरचा पराभव केला. तिने रोमांचक लढतीत 6-4, 4-6, 6-3 ने बाजी मारली. तिने दोन तास 21 मिनिटांत रंगलेल्या रोमांचक लढतीत शानदार विजय मिळवला.

विल्फ्रेड त्सोंगा चौथ्या फेरीत
फ्रांन्सच्या ज्यो विल्फ्रेंड त्सोंगाने पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत धडक मारली. त्याने तिसर्‍या फेरीत सर्बियाच्या व्हिक्टर ट्रोइस्कीचा पराभव केला. त्याने या लढतीत 6-3, 6-3, 6-3 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. या वेळी व्हिक्टरला प्रत्युत्तराची एकही संधी मिळाली नाही.

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा
सानिया-बेथानी दुसर्‍या फेरीत
भारताची खेळाडू सानिया मिर्झा व बेथानी माटेक-सँडने रविवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली. या सातव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीत अलिझे कार्नट व विरगिनिई राझ्झानोचा पराभव केला. सानिया-बेथानीने अवघ्या 82 मिनिटांमध्ये लढतीत 6-3, 6-4 अशा फरकाने विजय मिळवला. या इंडो-अमेरिकन जोडीचा दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या लायुरेन डेव्हिस व मेगान मोयल्टनसोबत सामना होईल.

नोवाक योकोविकचा विजय
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार नोवाक योकोविकने बग्लेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवचा पराभव केला. त्याने लढतीत 6-2, 6-2, 6-3 ने एकतर्फी विजय मिळवला. या लढतीच्या तिसर्‍या सेटदरम्यान योकोविकला दुखापतीमुळे काही काळ सामना थांबवावा लागला. या वेळी त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने पुनरागमन करताना सामना जिंकला. यासह त्याने दिमित्रोवकडून माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पराभवाचा बदला घेतला.

सेरेना 70 मिनिटांत विजयी
दुसरीकडे महिला गटात अमेरिकेची स्टार खेळाडू सेरेना विल्यम्सने अवघ्या 70 मिनिटांत विजय मिळवला. तिने इटलीच्या रॉबर्टा विन्सीचा पराभव केला. तिने 6-1, 6-3 ने चौथ्या फेरीचा सामना जिंकला.

निकोलस अलमाग्रोचा धक्कादायक पराभव
दुसरीकडे स्पेनच्या निकोलस अलमाग्रोला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला टॉमी रोब्रेडोने पराभूत केले. या रोमांचक लढतीत त्याने 6-7, 3-6, 6-4, 6-4, 6-4 ने विजय मिळवला. सलग दोन सेट जिंकल्यानंतरही निकोलसला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. तिसर्‍या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत रोब्रेडोने बाजी मारली.