आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams Vs Victoria Azarenka In Final American Open Tennis

अझारेंका-सेरेनात फायनल; चीनच्या ली ना हिचा पराभव तर पेनेट्टाचे आव्हान संपुष्टात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- गतविजेती आणि जगातील नंबर वन सेरेना विल्यम्स व दुसरी मानांकित व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यात अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची फायनल रंगणार आहे. योगायोगाने सलग दुसर्‍या वर्षी या दोघी महिला एकेरीच्या किताबासाठी समोरासमोर येत आहेत.

अव्वल मानांकित सेरेनाने उपांत्य सामन्यात चीनच्या ली नाचा पराभव करून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. तिने 6-0, 6-3 अशा फरकाने सामना जिंकला. दुसर्‍या उपांत्य सामन्यात बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने इटलीच्या लाविया पेनेट्टाला धूळ चारली. तिने सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-2 ने विजय मिळवला.

चीनच्या ली नाने उपांत्य सामन्यात जगातील नंबर वन सेरेनाकडून सपशेल पराभव पत्करला. ली नाच्या निराशाजनक कामगिरीचा फायदा घेत अमेरिकेच्या खेळाडूने 29 मिनिटांत पहिला सेट जिंकला. मात्र, दुसर्‍या सेटमध्ये पाचव्या मानांकित खेळाडूने दमदार पुनरागमन केले. तिने सहा मॅच पाइंट वाचवले. मात्र, 58 मिनिटांत सेरेनाने बाजी मारली. दुसरीकडे सेरेना- व्हीनसला ओपनच्या महिला दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुहेरीत या सातव्या मानांकित जोडीचा पराभव झाला.

सलग दुसर्‍यांदा किताबासाठी रंगणार काट्याची लढत

अझारेंका काढणार वचपा
दोन वेळची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन व्हिक्टोरिया अझारेंकाला गतवर्षी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. तिला गतवर्षी अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये सेरेनाने पराभूत केले होते. आता पुन्हा अंतिम सामन्यात सेरेनाला धूळ चारण्याचा अझारेंकाचा प्रयत्न असेल.

सेरेनाला विक्रमाची संधी
सेरेनाला विक्रम करण्याची संधी आहे. महिला एकेरीचा किताब जिंकल्यास सेरेना 1968 मध्ये टेनिसचे व्यावसायिककरण झाल्यानंतर वयाच्या 31 व्या वर्षी हे विजेतेपद पटकावणारी पहिली सर्वांत वयस्कर महिला खेळाडू ठरेल. यापूर्वी, हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मार्गेटच्या नावे आहे.

मिर्नी-आंद्रेयाने जिंकला मिश्र दुहेरीचा किताब
बेलारूसचा मॅक्स मिर्नी आणि आंद्रेया हलावकोवाने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचा किताब जिंकला. या जोडीने मेक्सिकोच्या सँटियागो गोंजालेझ व अमेरिकेच्या एबीगेल स्पियर्सला पराभूत केले. मिर्नी-आंद्रेयाने 7-6, 6-3 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला. 36 वर्षीय मिर्नीचा हा 12 ग्रँडस्लॅम किताब ठरला.