आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Serena Williams Win Despite Ankle Injury In Australian Open 2013

PHOTOS: वेदनेमुळे टेनिस कोर्टवर कोसळली सेरेना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- दुखापतींवर मात करून पुढे जाणे हे चॅम्पियन खेळाडूचे लक्षण असते. अमेरिकन टेनिसस्‍टार सेरेना विलियम्‍सने आपल्‍या प्रबळ इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या पहिल्‍या सामन्‍यात शानदार विजय नोंदवला.

सेरेनाचा ऑस्‍ट्रेलियन ओपनच्‍या शुभारंभाचा सामना एडिना गालोविट्सशी झाला. मात्र, पहिल्‍याच सामन्‍यात तिला टाचेच्‍या दुखापतीचा सामना करावा लागला. पायाला दुखापत झाल्‍यामुळे ती अचानक कोर्टवर पडली. प्रेक्षकांना सेरेना आता सामना सोडेल असे वाटले. परंतु, असे झाले नाही. सेरेनाने शानदार पुनरागमन करीत सामना 6-0,6-0 असा जिंकत पुढच्‍या फेरीत प्रवेश केला.

यापूर्वीच्‍या सामन्‍यात पहिल्‍या दिवशी रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्‍हाने आपल्‍या पहिल्‍या सामन्‍यात ओल्‍गा पुचकोवाचा एकतर्फी पराभव केला. 55 मिनिटे चाललेल्‍या या सामन्‍यात 6-0,6-0 ने पराभूत करून पुढच्‍या फेरीत प्रवेश केला. दुखापतीमुळे शारापोव्‍हाला ब्रिस्‍बेन इंटरनॅशनलमधून बाहेर पडावे लागले होते. तर पुरूष गटात नोव्‍हाक जोकोविचनेही विजयी सुरूवात केली.

अधिक जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...