आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेरेना, शारापोवा तिस-या फेरीत; कर्बरचा पराभव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा - दुसरी मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि तिसरी मानांकित रशियाच्या मारिया शारापोवा यांनी कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेतील पाचवी मानांकित जर्मनीच्या अँजोलिक कर्बरला मात्र धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.

विश्व क्रमवारीतील माजी नंबर वन आणि 15 वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने रशियाच्या दारिया गावरिलोला 6-2, 6-1 ने पराभूत केले. इतर एका लढतीत मारिया शारापोवाने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्शियाला 6-3, 6-2 ने मात दिली. यादरम्यान पाचवी मानांकित अँजोलिक कर्बरचा पराभव झाला. तिला जर्मनीच्या मोन बार्थेल हिने 6-1, 6-2 ने नमवत तिस-या फेरीत प्रवेश केला. यापूर्वी 12 वी मानांकित मारिया किरलेंको रिटायर झाल्यामुळे ती पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर झाली.

सानिया मिर्झा-बेथानी माटेकचा पराभव
भारताची सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार अमेरिकेची बेथानी माटेक सेंड्रस यांना येथे पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना अमेरिकेची लिसा रेमंड आणि ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर यांनी आक्रमक खेळ करून 4-6, 2-6 ने हरवले.