आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना विल्यम्स तिसर्‍या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मियामी- जगातील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्सने शुक्रवारी मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. या विजयासह तिने सलग सहाव्यांदा मियामीचा चषक नावावर करण्यासाठी आगेकूच केली. अमेरिकेच्या सेरेनाने इटलीच्या लेविया पेनेटाला 6-1, 6-1 ने धूळ चारली.

दुसरीकडे व्हीनस विल्यम्सने स्पर्धेत दुसर्‍या फेरीत विजय मिळवला. तिने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या किमिको डेट क्रुमचा 7-6, 3-6, 6-4 अशा फरकाने पराभव केला.

चौथ्या मानांकित रंदावांस्काने तैवानच्या सी सू वीवर 6-3, 6-2 ने विजय मिळवला. ली नाने किकी बरटेन्सला 6-3, 6-1 ने पराभूत केले.