आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीकडे टी-२० संघाचे नेतृत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अष्टपैलू शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानच्या टी - २० संघाच्या कप्तानपदी निवड केली आहे. विशेष म्हणजे २०१६ च्या टी -२० च्या विश्वचषकापर्यंत त्याच्याकडेच कप्तानपद कायम ठेवले जाणार असले तरी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांकरिता संघाचे कर्णधारपद हे मिसबाह उल हककडेच कायम ठेवण्यात आले आहे.
लोकशाही पद्धतीनेच पीसीबीने हे सर्व निर्णय घेतले असल्याचे अध्यक्ष शहरयार खान यांनी म्हटले आहे. क्रिकेट कमिटीच्या आणि मंडळाच्या सर्वप्रकारे चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी नमूद केले. अर्थात कप्तानांची नावे जाहीर करण्यात आली असली तरी पुढील स्पर्धांसाठी संघाची निवड अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दुबईत रंगणार आॅस्ट्रेलियाविरुद्धचे सामने येत्या 5 आॅक्टोबरपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धचे टी - २० सामने पाकिस्तानी संघ दुबईत खेळणार आहे. त्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवरच आफ्रिदीची निवड करण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या टी - २० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ प्रथमच उपांत्य फेरीतही पोहोचू न शकल्याचे निमित्त करून मुहम्मद हाफीजला पायउतार करण्यात आले आहे. आफ्रिदीच्या नावाबरोबरच शोएब मकसूदचे नावदेखील चर्चिले गेले. मात्र, बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आफ्रिदीचा
अनुभव ध्यानी घेऊन त्याच्याच नावाला पसंती दिली. युसूफने पीसीबीवर ओढले ताशेरे एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकापूर्वी पीसीबीने टी - २० चे सामने
ठेवल्याबद्दल पाकिस्तानचा माजी कप्तान मोहम्मद युसूफ याने पीसीबीवर ताशेरे ओढले आहेत. अशी मालिका आयोजित करण्यामागे नक्की काय विचार आहे ? असेदेखील युसूफने म्हटले आहे. सध्या पाकच्या क्रिकेटपटूंना एकदिवसीय सामन्यांचा सराव मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.