आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीने ऑफर धुडकावली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - राष्ट्रप्रेमाची तगमग आणि जाज्वल्य देशभक्तीसमोर पैशाचा रंगही फिका पडतो. याचाच प्रत्यय पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शााहिद आफ्रिदीने आणून दिला. आगामी बांगलादेश प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेच्या लिलावात सर्वाधिक महागडा क्रिकेटपटू ठरलेल्या शाहिद आफ्रिदीने देशभक्तीतून 7 लाख अमेरिकन डॉलर्सची ऑफर धुडकावून लावली. बीपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ढाका संघाने आफ्रिदीला सर्वात मोठी किंमत देऊन खरेदी केले होते.
9 फेब्रुवारीपासून बांगलादेश प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यामध्ये आफ्रिदीने सर्वाधिक भाव खात 7 लाख अमेरिकन डॉलर्सची किंमत मिळवली. मात्र या स्पर्धेदरम्यान पाकिस्तान-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे आफ्रिदीने बीपीएलमधून माघार घेतली. आफ्रिदी म्हणाला, मला देशाच्या संघाचा अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघाकडून खेळण्याला माझी पहिली पसंती आहे. या संघात मला स्थान मिळाले नाही तर मी दुस-या संघाकडून खेळण्याचा विचार करणार आहे.