आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआफ्रिदीच्या धुवाधार फटकेबाजीने पाकिस्ताने बांगलादेशला पराभूत करून विजयासह आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे भारताचे फायनलमधील प्रवेशाचे स्वप्नही भंगले. सामनावीर ठरलेल्या शाहिद आफ्रिदी (59) धावा केल्या. आफ्रिदीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने सामना जिंकला.
आफ्रिदीने 18 चेंडूमध्ये अर्धशतक करून नवा विक्रम प्रस्तापीत केला. 18 चेंडूमध्ये अर्धशतक बनविण्याचा हा तिसरा विक्रम त्याच्या नावावर आहे.
आफ्रिदीने 4 नोव्हेबर 1996 मध्ये श्रीलंकेविरुध्द अर्धशतक बनविले होते. तर याच सामन्यामध्ये 37 चेंडूमध्ये शतक झळकावले होते.
2002 मध्ये नेदरलँड विरुध्द 18 चेंडूमध्ये 55 धावा केल्या होत्या.
12 वर्षानंतर आफ्रिदीने पुन्हा फटकेबाजीचा अवतार दाखवून 18 चेंडूमध्ये अर्धशतक केले.
आफ्रिदीच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने सामना जिंकत आशिया चषकामध्ये दुस-यांदा अंतीम सामन्यामध्ये मजल मारली.
चाहत्यांची भावूक छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.