आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीचा अनोखा विक्रम, 400 षटकार ठोकणारा पहिलाच क्रिकेटपटू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तानचा अष्‍टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये 400 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. शनिवारी त्‍याने हा विक्रम आपल्‍या नावे केला.

शनिवारी त्‍याने वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या टी-20 सामन्‍यात दोन षटकारांच्‍या मदतीने 46 धावा बनवल्‍या. सुनील नारायणच्‍या गोलंदाजीवर मारलेला दुसरा षटकार हा त्‍याच्‍या करिअरमधला 400 वा षटकार ठरला. आफ्रिदीने सर्वाधिक 314 षटकार वनडेमध्‍ये ठोकले आहेत. कसोटीत 52 आणि टी 20मध्‍ये 34 षटकारांची नोंद आहे.

सर्वाधिक षटकार ठोकण्‍यामध्‍ये वेस्‍ट इंडीजचा ख्रिस गेल (353) दुस-या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा सनथ जयसुर्या (352) तिस-या ब्रँड मॅक्‍युलम (277) चौथ्‍या तर सचिन तेंडुलकर (264) पाचव्‍या क्रमांकावर आहे.