आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVEALED: शाहिद आफ्रिदीच्‍या खासगी आयुष्‍यातील हे रूप, तुम्‍ही पाहिलयं का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्‍तान टीमचा अष्‍टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्‍या जीवनावर आधारित चित्रपट आता रिलिज होतोय. कधी आपल्‍या कामगिरीने तर कधी वादामुळे चर्चेत असलेल्‍या या क्रिकेटपटूचे आयुष्‍यही एकदम रोमांचक असे आहे. कधी तो आपल्‍या चेंडूने फलंदाजांची वाट लावतो तर कधी बॅटने गोलंदाजांना बदडतो. कधी-कधी यापासूनही कंटाळा आला तर तो चेंडूही कुरतडण्‍याचा प्रयत्‍न करतो.

पाकिस्‍तानमध्‍ये आफ्रिदीला जितकी लोकप्रियता मिळालेली आहे. कदाचित दुस-याला खचितच मिळाली असेल. याचाच एक किस्‍सा, पाकिस्‍तान भारताविरूद्धच्‍या कसोटीत पराभवाच्‍या उंबरठयावर होता. आफ्रिदी क्रीजवर होता. जोपर्यंत आफ्रिदी फलंदाजी करीत होता, तोपर्यंत प्रेक्षकांनी स्‍टेडिअम खचाखच भरलेले होते. जसा आफ्रिदी झहीर खानच्‍या गोलंदाजीवर बाद झाला. प्रेक्षकांनी जागा सोडण्‍यास सुरूवात केली. अवघ्‍या पाच मिनिटांत स्‍टेडिअम रिकामे झाले होते. यावरून तुम्‍हाला त्‍याच्‍या लोकप्रियतेची कल्‍पना येईल. इतक्‍या लो‍कप्रिय असलेल्‍या क्रिकेटपटूवर जर चित्रपट येत असेल तर तो बॉक्‍स ऑफिसवर निश्चितच विक्रमी गल्‍ला जमवेल, हे निश्चित.

आफ्रिदीच्‍या चित्रपटानिमित्त त्‍याच्‍या आयुष्‍यातील काही न बघितलेले क्षण. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून घ्‍या आफ्रिदीच्‍या वेगवेगळया अदांची मजा...