आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahrukh Khan Wish To Own Football Team Of Kolkata

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटनंतर फुटबॉलवर राज्‍य करायचे आहे किंग खानला, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- आयपीएलमधील कोलकाता नाईटरायडर्स टीमचा मालक शाहरूख खानला आता फुटबॉलमध्‍येही आपली टीम बनवायची आहे. त्‍याची नजर आता आयपीएलच्‍या धर्तीवर होणा-या फुटबॉल लीगवर आहे. कोलकाता फुटबॉल क्‍लब टीम बनवता आली तर आपल्‍या आनंद होईल, असे शाहरूखने म्‍हटले आहे.

तो म्‍हणाला,' सुरूवातीला मला गोवा फुटबॉल क्‍लब डेम्‍पोमध्‍ये भागीदारी करायची होती. परंतु, आता देशात नवीन फुटबॉल लीग सुरू होणार आहे. आता मी त्‍यावर नजर ठेऊन आहे. जर कोलकाता फ्रेंचायजी खरेदी करता आली तर मला खूप आनंद होईल.'

पुढच्‍या वर्षीच्‍या 18 जानेवारीपर्यंत फुटबॉल आयलीग सुरू करण्‍याचा प्रस्‍ताव ठेवण्‍यात आलेला आहे. यामध्‍ये आठ टीम असतील, त्‍या पुढीलप्रमाणे पुणे, मुंबई, चेन्‍नई, कोलकाता, कोची, गोवा, दिल्‍ली आणि बेंगळूरू टीमचा समावेश असेल. गुवाहाटी आणि हैदराबादला रिजर्व्‍ह फ्रेंचायजी म्‍हणून ठेवण्‍यात आले आहे. फ्रेंचायजीचा लिलाव येत्‍या सप्‍टेंबर किंवा ऑक्‍टोबरमध्‍ये होईल.

शाहरूख खान क्रिकेट टीम कोलकाता नाईटरायडर्सचा मालक आहे. गेल्‍या काही वर्षांपासून मनोरंजन जगतातील व्‍यक्‍तींनी स्‍पोर्ट्स टीम खरेदी करण्‍यात उत्‍सुकता दाखवली आहे. दक्षिणेकडील स्‍टार्सनी नुकत्‍याच सुरू झालेल्‍या बॅडमिंटन लीगमध्‍ये आपली टीम बनवली आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या वेग-वेगळया क्षेत्रातून आलेल्‍या कोणकोणत्‍या दिग्‍गजांनी खरेदी केली स्‍पोर्ट्स टीम...