आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shakeel Abbasi Out Of Pakistan Hockey Training Camp

‘रोजे’ ठेवल्यामुळे शकील अब्बासी शिबिरातून बाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- पाकने आपला नंबर वन फॉरवर्ड खेळाडू शकील अब्बासीला ‘रोजे’ ठेवल्यामुळे राष्ट्रीय हॉकी शिबिरातून बाहेर करण्यात आले. अब्बासीने आदेश आणि नियमांचे उल्लंघन केल्याची स्पष्टोक्ती देत प्रशिक्षक अतर रसूल यांनी बाहेर करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

‘शिबिरात खेळाडूंचे पूर्ण लक्ष्य फिटनेस आणि सरावावर असणे गरजेचे आहे. यामुळे त्याला रोजे ठेवणे शक्य होणार नाही. अब्बासीला रोजे ठेवायचे असेल तर त्याला आपल्या घरीच असे करावे लागेल. हे राष्ट्रीय संघाचे शिबिर आहे.
खेळाडूंना सरावावर अधिक भर देण्याची गरज आहे. आशिया चषक आमच्यासाठी ‘करा वा मरा’ आहे. ’ या स्पर्धेत हरलो तर वर्ल्डकपचा प्रवेश हुकेल,’असेही रसूल म्हणाले. दरम्यान, प्रशिक्षक रसूल यांचे म्हणने न ऐकल्याची कबुली अब्बासीने दिली आहे.