आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील हावभाव करणार्‍या या क्रिकेटपटूवर तीन सामन्यांसाठी बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका- बांगलादेश क्रिकेट संघातील एका ऑलराउंडर क्रिकेटपटूला अश्लील हावभाव करणे चांगलेच महागात पडले आहे. शाकिब अल हसन त्याचे नाव आहे. शाकिबवर लाइव्ह कॅमेरासमोर अश्लील हावभाव केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आशिया चषकातील पहिले दोन सामने आणि शनिवारी श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय सामन्यातून शाकिबला निलंब‍ित करण्‍यात आले आहे.

दरम्यान, गुरूवारी ढाकामध्ये झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात शाकिब 24 धावांवरच बाद झाला होता. त्यानंतर तो प्लेयर्स बाल्कनीत उभा होता. त्याच्यावर कॅमेरा फोकस केला असता त्याने अश्लील हावभाव केले. याप्रकरणाची बांगलादेश क्रिकेट मंडळाने गंभीर दखल घेऊन 26 वर्षीय शाकिब अल हसनला तीन एक दिवसीय सामन्यांसाठी निलंबित केले आहे. एवढेच नाही तर शाकिबला तीन लाख टका (बांगलादेशी चलन) दंड ठोठावण्यात आला आहे.