बार्सिलोना - कोलंबियन पॉप स्टार शकीराने दुस-या मुलाला जन्म दिला. प्रसुतीसाठी हॉस्पीटलमध्ये दाखल झालेल्या शकीराला बुधवारी सुटी मिळाली. यावेळी तिच्यासोबत बॉयफ्रेंड गेरार्ड पिक, मुलगा मिलान होते. बार्सिलोनाच्या टेक्नॉन हॉस्पीटलमध्ये ती भरती होती.
शकीराने सप्टेंबर महिन्यात ती दुस-यांदा गर्भवती असल्याचा खुलासा केला होता.
शकीराहून 10 वर्षांनी लहान आहे बॉयफ्रेंड
कोलंबियाची पॉप सिंगर शकीराचा बॉयफ्रेंड आणि लाइफ पार्टनर गेरार्ड शकीराहून 10 वर्षांनी लहान आहे. शकीरा 38 वर्षांची असून गेरार्ड 28 वर्षांचा आहे. ते दोघे 2010 पासून रिलेशनशिपमध्ये होते.
पुढील स्लाइडवर पाहा, गेरार्ड पिक आणि शकीराची हॉस्पिटलमधून परतानाची छायाचित्रे...