आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shane Watson Becomes A Father, Wife Gives Birth To Baby Boy

शेन वॉटसनला पुत्ररत्न, पत्नी ली ने दिला गोंडस मुलाला जन्म

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्ट्रेलियन संघाचा निलंबित उपकर्णधार शेन वॉटसन याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. वॉटसनला नुकतेच ऑस्ट्रेलियन संघातून शिस्त न पाळल्याने डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर वॉटसन तातडीने सिडनेला रवाना झाला होता. तसेच तातडीने परतण्याचे कारण पत्नीचे दिले होते. अखेर गुरुवारी भारतीय वेळेनुसार तीन वाजता त्याची पत्नी लीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. ऑस्ट्रेलियन संघात वॉटो नावाने प्रसिद्ध असलेला शेन आता पिता बनल्याने अधिक जबाबदारपणे खेळेल. संघाचा आज तो तारणहार आहे. मात्र शिस्त मोडल्याने त्याला संघातून निलंबित करण्यात आले आहे.