Home »Sports »From The Field» Shane Watson Is Ready To Bat In Middle-Order

मधल्या फळीसाठी सज्ज : वॉटसन

वृत्तसंस्था | Feb 10, 2013, 04:00 AM IST

  • मधल्या फळीसाठी सज्ज : वॉटसन

चेन्नई - अष्टपैलू शेन वॉटसन भारताविरुद्ध मालिकेत फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीविरुद्ध मधल्या फळीतसुद्धा खेळण्याची त्याची तयारी आहे. सलामीऐवजी मधल्या फळीत खेळण्यासाठी आवश्यक तंत्र आहे, असे त्याने म्हटले. 22 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आवडते सलामीचे स्थान मिळाले नाही तर मधल्या फळीत खेळण्यास वॉटसन तयार आहे. मालिकेत तो गोलंदाजी करणार नाही. तो केवळ फलंदाज म्हणून भारतात खेळेल.

यामुळे अशा प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडूला फलंदाजीसाठी कोणत्या स्थानावर खेळवावे, हे संघ व्यवस्थापनाला ठरवावे लागेल. काही काळासाठी वॉटसनने गोलंदाजी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापती टाळण्यासाठी आणि फलंदाजीवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियातील मालिकेत तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने भारताविरुद्ध वॉटसनला सलामीला खेळवण्याचा निर्णय घेतला तर कसोटीत डेव्हिड वॉर्नर आणि एड. कोवान या स्थिरावलेल्या जोडीला त्यांना फोडावे लागेल.

Next Article

Recommended