आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीरपूर - इंग्लंडचा स्टार फलंदाज केविन पीटरसनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर संपुष्टात आल्याने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसन याने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमनप्रमाणे पीटरसनला मार्गदर्शक मिळायला हवा, असेही वॉॅटसनने नमूद केले.
बांगलादेशात प्रारंभ झालेल्या टी-20 विश्वचषकातही पीटरसनचा समावेश नसल्याने दु:ख झाल्याचेही वॉटसन म्हणाला. इंग्लंड संघाचा कप्तान कुक आणि व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर पीटरसनच्या नावावरच काट मारण्यात आली. त्यामुळे पीटरसन या विश्वचषकात सहभागी नसणे ही संपूर्ण खेळाचीच हानी असल्याचेही त्याने नमूद केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.