आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: पितृत्वामुळे अधिक उदार मनाचा झालो-शेन वॉटसन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- नवजात मुलाला कवेत घेतल्यानंतर मला सर्व अडचणींचा विसर पडला आणि उदार मनाचा झालो, असे मत राजस्थान रॉयल्सचा शेन वॉटसनने मांडले. आयपीएल-6 मध्ये शनिवारी त्याने नाबाद 98 धावा काढून राजस्थानला सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवून दिला. ‘पितृत्व हा आयुष्यातील मोठा क्षण असतो. या मुलाच्या येण्यामुळे मी फार आनंदी झालो आहे. याच उदार भावनेने मी राजस्थानला विजय मिळवून दिला,’ असेही तो म्हणाला. गेल्या दोन महिन्यांपूर्वी, भारत दौर्‍यावर नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी वॉटसनला एका कसोटी सामन्यात बाहेर बसवण्यात आले होते.