आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांघाय मास्टर्स टेनिस: निशिकोरी, सेप्पीची विजयी सलामी; हेविट पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय - जपानच्या केई निशिकोरी, आंद्रे सेप्पी, फेबियो फोगनिनी यांनी शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेत मंगळवारी शानदार विजयी सलामी दिली.जगातील माजी नंबर वन लियोटन हेविटला शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. इटलीच्या आंद्रे सेप्पीने सलामी सामन्यात हेविटवर मात केली. त्याने 6-4, 6-2 अशा फरकाने सामना जिंकला. केई निशिकोरीने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या गिग्रोर दिमित्रोवला पराभूत केले. त्याने 6-3, 6-4 अशा फरकाने विजय मिळवला. फोगनिनीला पहिल्या फेरीत विजय मिळवण्यासाठी शर्थीची झुंज द्यावी लागली. सामन्यात पी. लोर्नेझीने त्याला विजयासाठी चांगलेच झुंजवले. मात्र, फोगनिनीने 4-6, 7-6, 6-4 ने सामना जिंकला.


फेडरर वर्चस्व कायम ठेवणार!
स्वीसचा रॉजर फेडरर लंडनमध्ये वर्ल्ड टूर टेनिस फायनल्समध्ये किताबावरील वर्चस्व कायम ठेवेल, असा विश्वास स्पेनचा राफेल नदालने व्यक्त केला. फेडरर फॉर्मात नसला तरीही नदालने या महान खेळाडूला पाठींबा दिला आहे.


शारापोवाची माघार
जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेल्या मारिया शारापोवाने आगामी डब्ल्यूटीए चॅम्पियनशिपमधून माघार घेतली. खांद्याच्या गंभीर दुखापतीमुळे रशियाच्या खेळाडूने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आयोजकांनी दिली. येत्या 22 ऑक्टोबरपासून इस्तंबूलमध्ये स्पर्धा होणार आहे.