आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Filed His Candidature For Mumbai Cricket Association Election

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांचा अर्ज दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यात लढत होणार आहे. पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर मुंडे यांनी मंगळवारीच अर्ज भरला होता. एमसीएची निवडणूक 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे.


एमसीएच्या निवडणुकीत दिग्गज राजकीय नेत्यांनी उडी घेतल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. पवार यांना महाडदळकर, रत्नाकर शेट्टी आणि विजय पाटील गटाचे समर्थन असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार यांच्या अर्जावर शेट्टी यांनी सूचक, तर रवी सावंत यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्ष-या केल्या. दरम्यान, राजकीय वाद टाळण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य आशिष शेलार यांनी उपाध्यक्षपदासाठी भरलेले आपले नामांकन मागे घेतले.