आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharad Pawar Set To Contest BCCI Elections, Claim Sources

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांच्या बीसीसीआय मार्गात अरुण जेटलींचे काटे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बीसीसीआयच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा बोर्डाच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत असतानाच पवारांना रोखण्यासाठी एन. श्रीनिवासन यांचे पाठीराखे आणि भाजपमधील बीसीसीआयचे सदस्यही सक्रिय झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एन. श्रीनिवासन यांनी अलीकडेच नवी दिल्लीत भाजप नेते अरुण जेटली यांची भेट घेतली होती. बीसीसीआयच्या निवडणुकीत पवारांना मदत करायची की नाही, याबाबतच्या भाजपच्या निर्णय प्रक्रियेतील जेटली हे महत्त्वाचे सदस्य आहेत. विद्यमान राजकीय स्थिती पाहता जेटली सध्या भाजपने पवारांना मदत करावी, याबाबत अनुकूल नाहीत, असे कळते. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा मान या वेळी पूर्व विभागाचा आहे. पूर्व विभागाच्या कोणत्या दोन सदस्यांचा पाठिंबा पवारांच्या उमेदवारीला मिळणार, हेही अद्याप स्पष्ट नाही. दुसरीकडे श्रीनिवासन यांनी पूर्व विभागाच्या सर्वच्या सर्व म्हणजे जगमोहन दालमिया यांच्यासह सहाही संघटनांचा विश्वास प्राप्त केला आहे.

श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपरकिंग्जचा मोह सोडल्यास त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढता येईल. त्या दृष्टीने आपल्या समर्थकांची मते आजमावण्यासाठी त्यांन फेब्रुवारीला चेन्नईत खाजगी बैठक बोलावली आहे. त्यानंतर फेब्रुवारी रोजी चेन्नईतच बीसीसीआय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीतच वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुका यांच्या तारखा निश्चि होतील.

पश्चिमविभागावर पवारांची भिस्त : श्रीनिवासनपूर्व विभागातील आपल्या पसंतीचा अध्यक्षपदाचा उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणुका घेऊन त्यावेळी श्रीनिवासन स्वत:ची उमेदवारी घोषित करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या मार्चपूर्वी निवडणुका घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने श्रीनिवासन "कॅम्प' आखणी करत आहेत. दुसरीकडे शरद पवार आपल्या पश्चिम विभागाच्या भक्कम पाठिंब्याच्या आधारे आणि बीजेपीचा प्रभाव असणाऱ्या मतदात्यांच्या सहकार्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.