आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BCCI च्या अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत शरद पवारांची उडी, सामना रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्‍यक्षपदाची निवडणूक लढणार आहेत. बीसीसीआयची येत्या मार्च महिन्यात बैठक होणार असून त्यात शरद पवार उपस्थित राहू शकतात, अशी माहिती सूत्रांन‍ी दिली आहे. शरद पवार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (आयसीसी) माजी अध्‍यक्ष आहेत.
इंडियन प्रीमिअर लीगमधील (आयपीएल) स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे बीसीसीआयच्या अध्‍यक्षपदाची निवडणूक यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करून पुढील सहा आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक होणे आवश्‍यक असल्याचे म्हटले होते. कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून मार्चमध्ये पहिली बैठक घेणे आवश्‍यक आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, श्रीनिवासन नाहीत 'रेस'मध्ये...