आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शारापोवा, अजारेंका उपांत्यपूर्व फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोहा- जगातील नंबर वन टेनिसपटू व्हिक्टोरिया अजारेंका, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवाने कतार ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित अजारेंकाने अमेरिकेच्या क्रिस्टिना मक्हेलला 6-0, 6-0 ने पराभूत करून क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित केला. दुस-या लढतीत जगातील दुसºया क्रमांकाची खेळाडू सेरेना विल्यम्सने पोलंडच्या उरजुला रंदावास्काला 6-0, 6-3 ने धूळ चारली.
तिसºया मानांकित मारिया शारापोवानेदेखील आपली विजयी मोहीम अबाधित ठेवली. तिने चेक गणराज्यच्या क्लारा जाकोपालोवावर सलग दोन सेटमध्ये 6-3, 6-3 ने विजय मिळवला. चौथ्या मानांकित अज्निझस्का रंदावास्काने 13 व्या मानांकित अ‍ॅना इव्हॉनोविकला 6-1, 7-6 ने हरवले.