आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharapova To Meet Wozniacki For Indian Wells Crown

इंडियाना वेल्स : शारापोवा-कारोलिन वोज्नियाकी यांच्यात फायनल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियाना वेल्स - माजी चॅम्यिपन कारोलिन वोज्नियाकी व मारिया शारापोवा यांच्यात इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची फायनल होणार आहे.

आठव्या मानांकित वोज्नियाकीने महिला एकेरीच्या सेमीफायलनमध्ये जर्मनीच्या केर्बरवर 2-6, 6-4, 7-5 अशा फरकाने विजय मिळवला. दुसरीकडे मारिया शारापोवा व मारिया किरिलेंको या रशियाच्या दोन महिला टेनिसपटूंमध्ये दुसरा उपांत्य सामना झाला. चार ग्रॅँड स्लॅम विजेत्या मारिया शारापोवाने या लढतीत किरिलेंकोला सरळ दोन सेटमध्ये 6-4, 6-3 ने धूळ चारली.

जुआन मार्टिनचा सनसनाटी विजय - दुसरीकडे पुरुष गटातील उपांत्यपूर्व लढतीत अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेत्रोने सनसनाटी विजय मिळवला. त्याने जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या अ‍ॅडी मुरेला धूळ चारली. अर्जेंटिनाच्या खेळाडूने ही लढत 6-7, 6-3, 6-1 अशा फरकाने जिंकली. या विजयासह त्याने उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसर्‍यांदा 2009 यूएस चॅम्पियन जुआनने दुसर्‍यांदा मुरेला पराभूत केले. आतापर्यंत हे दोघे सात वेळा आमनेसामने आले. यामध्ये पाच लढतीत मुरेने विजय मिळवला.

नोवाक योकोविक अंतिम फेरीत - जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविकने इंडियाना वेल्स टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात ज्यो विल्फ्रेंड त्सोंगावर 6-3, 6-1 ने विजय मिळवला. फायनलमध्ये सर्बियाचा योकोविक व अर्जेंटिनाचा जुआन मार्टिन समोरासमोर असतील.