आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शारापोवा, योकोविक उपांत्य फेरीत; रंदावांस्का बाहेर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- रशियाची मारिया शारापोवा व नोवाक योकोविकने मंगळवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. शारापोवाने महिला एकेरीत एकातेरिकना माकारोवाला 6-2, 6-2 ने पराभूत केले. चीनच्या ली नाने पोलंडच्या एग्निजस्का रंदावांस्कावर 7-5, 6-3 ने मात केली. तसेच नोवाक योकोविकने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत टॉमस बर्डिचला 6-1, 4-6, 6-1, 6-4 ने हरवले.

दुसरीकडे स्पेनच्या डेव्हिड फेररने रोमांचक लढतीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुरेख विनर्स व आक्रमक सर्व्हिस करत त्याने शानदार विजय मिळवला. त्याने तीन तास 44 मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीत निकोलस अलमाग्रोला 4-6, 4-6, 7-5, 7-6, 6-2 अशा फरकाने धूळ चारली. पुरुष एकेरीतील हा सामना दिवसभराचे खास आकर्षण ठरला. स्पेनच्या अलमाग्रोने दमदार सुरुवात करत दोन सेट आपल्या नावे केले. मात्र, तिस-या सेटमध्ये डेव्हिड फेररने पुनरागमन केले. आक्रमक सर्व्हिस करत स्पेनच्या फेररने 5-4 ने आघाडी घेतली. हा सेट टायब्रेकरपर्यंत रंगला. अखेर फेररने यात 7-5 ने बाजी मारली. त्यानंतर दोन सेट जिंकून फेररने सामन्यात अलमाग्रोला पराभूत केले. त्याने हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

भूपती-पेत्रोवा अंतिम आठमध्ये
भारताच्या महेश भूपतीने आपली जोडीदार नादिया पेत्रोवासोबत ऑ स्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पाचव्या मानांकित भूपती-पेत्रोवोने मिश्र दुहेरीत कॅटरिना श्रेबोटनिक-नेनाद जिमोनजिकवर 3-6, 6-2, 10-5 अशा फरकाने विजय मिळवला.
शारापोवाचा सहज विजय
महिला एकेरीतील दुस-या मानांकित शारापोवाने माकारोवावर सरळ दोन सेटमध्ये 6-2, 6-2 असा एकतर्फी विजय मिळवला. यासह तिने करिअरमध्ये सोळाव्यांदा ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य सामन्यात धडक मारली. जगातील दुस-या क्रमांकाची खेळाडू शारापोवाने शानदार कामगिरी करत 22 विनर्स मारले आणि पाच वेळा माकारोवाची सर्व्हिस मोडीत काढली. उपांत्य लढतीत रशियाच्या शारापोवाला चीनची स्टार खेळाडू ली नाच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.