सिडनी - येत्या नऊ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलामीच्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. या वेळी ऑस्ट्रेलिया संघात शॉन मार्शला संधी देण्यात आली. फिलिप ह्यूजच्या निधनानंतर ही कसोटी पुढे ढकलण्यात आली. शॉनसह संघात त्याचा भाऊ मिशेल मार्शलाही भारतविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. ३१ वर्षीय शॉन मार्शने २०११ मध्ये कसोटीत पदार्पण केले होते. त्याने नऊ कसोटींत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले. फेब्रुवारीत आफ्रिकेविरुद्ध दुस-या कसोटीत शॉन सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आता देशांतर्गत स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर त्याने संघात पुनरागमन केले आहे.
क्लार्कचा सहभाग अनिश्चित!
मार्शला संधी देण्यात आल्याने कर्णधार मायकेल क्लार्कचा सलामीच्या कसाेटीतील सहभाग हा अनिश्चित मानला जात आहे. क्लार्क सध्या दुखापतीने त्रस्त आहे.