आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धवनने ठोकले ऐतिहासिक द्विशतक, टीम इंडियाने मोडला स्‍वत:चाच विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया - जबरदस्त फॉर्मात असलेला भारताचा सलामीवीर शिखर धवनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रेकॉर्डब्रेक फलंदाजी करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकत भारतीय विक्रम केला. विश्वविक्रम मोडण्यासाठी त्याला केवळ 20 धावा कमी पडल्या. भारत अ संघाचा सलामीवीर शिखरने येथे तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 150 चेंडूंत 30 चौकार आणि 07 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 248 धावांची विक्रमी खेळी केली. भारत अ संघाने 3 बाद 433 धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या या तुफानी फलंदाजीच्या बळावर शिखरची ही खेळी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि प्रथम र्शेणीच्या लिस्ट ए सामन्यांतील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी खेळी ठरली आहे.

इंग्लंडच्या अँलेस्टर ब्राऊनच्या 268 धावांचा विक्रम मोडण्यासाठी शिखर धवनला 20 धावा कमी पडल्या. यापूर्वी आपल्या कारकीर्दीत धवनची सवरेत्तम कामगिरी प्रथम र्शेणीत 224 धावा, लिस्ट ए सामन्यात नाबाद 155 धावा, वनडे सामन्यात 116 धावा, तर कसोटीत 187 अशी आहे. एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा शिखर भारताचा तिसरा आणि एकूण 13 वा फलंदाज ठरला आहे.

भारत अ संघाचा द. आफ्रिका अ संघावर विजय
भारत अ संघाने द. आफ्रिका अ संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत 3 बाद 433 धावा काढल्या. प्रत्युत्तरात द. आफ्रिका अ संघाने जबरदस्त झुंज देताना सर्वबाद 394 धावा काढल्या. आफ्रिकेकडून हेन्ड्रीक्स (106), जारस्वेल्ड (108) यांनी शतके ठोकली. तत्पूर्वी, भारताकडून शिखर धवन (248) आणि मुरली विजय (40) यांनी 91 धावांची सलामी दिली. विजय बाद झाल्यानंतर पुजाराने धवनला साथ दिली. पुजाराने (नाबाद 109) शतक ठोकले. या विजयासह भारताने फायनलमध्ये प्रवेश केला.

संक्षिप्त धावफलक
भारत अ संघ: 50 षटकांत 3 बाद 433 धावा. अवांतर : 12. (शिखर धवन 248, मुरली विजय 40, चेतेश्वर पुजारा नाबाद 109, कार्तिक नाबाद 18, 1/62 हेंड्रीक्स, 1/94 विजोन, 1/98 थेरॉन)
दक्षिण आफ्रिका अ संघ: 48.4 षटकांत सर्वबाद 394 धावा. अवांतर : 19. (आर. हेड्रिक्स 106, रोसोऊ 44, जारस्वेल्ड 108, ओटोंग 49, वॉन डर र्मवे 36, 4/76 इश्वर पांडे, 2/79 उनादकत, 1/35 सुरेश रैना, 1/52 नदीम, 1/42 स्टुअर्ट बिन्नी, 1/24 शिखर धवन.)