आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Family And K Shrikant Worship At Deori Temple Of Ranchi

PHOTOS: पत्‍नी आणि मुलांबरोबर देवडी मंदिरात पोचला शिखर धवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- टीम इंडियाच्‍या निवडसमितीचे माजी अध्‍यक्ष के श्रीकांत आणि टीम इंडियाचा स्‍टार फलंदाज शिखर धवन शुक्रवारी संध्‍याकाळी सुमारे चार वाजता सहकुटुं‍ब देवडी मंदिरात पोहोचले. या सर्वांनी प्राचीन मंदिरात विधीव्रत पुजा केली. मंदिरात क्रिकेटपटू आल्‍याचे वृत्त परिसरात पसरताच मोठी गर्दी जमली होती.

धवनने आपली पत्‍नी आणि मुलांबरोबर देवडी मंदिरात पोहोचला. धवनला पाहाताच लोकांनी त्‍याच्‍या नावाची नारेबाजी करण्‍यास सुरूवात केली.

देवडी देवी हे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे कुलदैवत आहे. माही तिथे पुजेसाठी कायम जात असतो. माहीमुळे टीम इंडियातील इतर क्रिकेटपटूही इथे येऊ लागले. सध्‍या चॅम्पियन्‍स लीगचे काही सामने धोनीच्‍या रांची येथे सुरू असल्‍यामुळे धवनही देवीचे दर्शन घेण्‍यासाठी आला होता. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा शिखर धवन आणि के श्रीकांत यांनी देवडी मंदिरात कशी केली पुजा...