आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan First Time In Top Ten Icc One Day Cricket Rankings

दक्षिण आफ्रिकेत धवनला करायचेय \'शिखर\' सर, टॉप टेनमध्‍ये तीन भारतीयांचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबरदस्‍त फॉर्ममध्‍ये असलेला भारताचा सलामीवीर शिखर धवन प्रथमच आयसीसीच्‍या वनडे रँकींगमध्‍ये टॉप टेन फलंदाजांच्‍या यादीत आला आहे. वेस्‍ट इंडिजविरुद्ध 3 सामन्‍यांच्‍या मालिकेत त्‍याने 159 धावा काढून रँकींगमध्‍ये दोन स्‍थानांची प्रगती केली आहे. उत्‍कृष्‍ट कामगिरीच्‍या जोरावर तो 736 गुणांसह नवव्‍या स्‍थानावर आला आहे.

शिखर धवनची खरी परीक्षा दक्षिण आफ्रिकेच्‍या दौ-यावर होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्‍या खेळपट्टयांवर चेंडू उसळी घेतो. अशा ठिकाणी खेळण्‍यासाठी सज्‍ज असल्‍याचे धवन सांगतो. धवलच्‍या मते तेथील परिस्थिती त्‍याच्‍या आक्रमक फलंदाजीसाठी पोषक ठरेल. उसळी घेणा-या खेळपट्ट्या माझ्या खेळासाठी चांगल्‍या राहतील. मी चांगला फॉर्म दिर्घ कालावधीसाठी टिकवून ठेवण्‍यासाठी आतूर आहे, असे धवन म्‍हणाला.

आयसीसीच्‍या रँकींगमध्‍ये फलंदाजांचा क्रम पाहा पुढील स्‍लाईड्समध्‍ये.....