आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Is New Wall And Mr Dependable Of Indian Cricket Team

योग आणि उधारीच्‍या बॅटने बनवले धवनला आक्रमक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन सध्‍या चांगलाच फॉर्मात दिसतोय. चॅम्पियन ट्रॉफीनंतर झिम्‍बाब्‍वे दौ-यातील दुस-या वनडेमध्‍ये शानदार प्रदर्शन करणा-या धवनने अल्‍पावधीत टीममधील सहका-यांचा विश्‍वास जिंकला आहे. शुक्रवारच्‍या मॅचमध्‍ये धवनने सुरूवातीला संयमी फलंदाजी आणि नंतर आपला आक्रमकपणा दाखवला. धवनच्‍या प्रदर्शनाची खास बाब म्‍हणजे त्‍याने वनडेमध्‍ये आतापर्यंत तीन शतके ठोकली आहेत. आणि उल्‍लेखनीय म्‍हणजे ही तिन्‍ही शतके विदेशी भूमीवर झळकावली आहेत.

शुक्रवारचा दिवस आपला होता असे त्‍याने मॅच जिंकल्‍यानंतर म्‍हटले. तसं पाहिलं तर धवनची ही खेळी निर्दोष अशी नव्‍हती. त्‍याला दोन वेळा जीवदान मिळाले होते. कार्तिकनेही या मॅचमध्‍ये चांगली खेळी केल्‍याचे धवनने म्‍हटले.

बहुतांश वेळा भारतीय फलंदाज विदेशी भूमीवर अपयशी ठरतात. धवन मात्र विदेशी भूमीवर यशस्‍वी ठरतोय. त्‍याने याचवर्षी 6 जून 2013ला आपले पहिले शतक (114) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कार्डिफ येथे ठोकले होते. त्‍यानंतर ओव्‍हलमध्‍ये वेस्‍ट इंडीजविरूद्ध दुसरे शतक (102 नाबाद) 11 जून 2013 ला केले होते, आणि आता शुक्रवारी हरारे येथे झिम्‍बाब्‍वेविरूद्ध तिसरे शतक (116) ठोकले. आता धवनची खरी परीक्षा आगामी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्‍या कसोटी मालिकेत आहे. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्‍टेनविरोधात तो कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.