आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Shows Fitness At Practice Session In England News In Marathi, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटच्‍या चाहत्‍यांसाठी खुशखबर, तंदुरुस्‍त आहे शिखर धवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लीसेस्‍टर - गुरुवारी झालेल्‍या लीसेस्‍टरविरुध्‍दच्‍या सराव सामन्‍यामध्‍ये भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन अतिफ शेखच्‍या उसळत्‍या चेंडूमुळे जायबंदी झाला होता. 60 धावा काढून त्‍याने मैदान सोडले होते. परंतु शुक्रवारी झालेल्‍या नेटप्रॅक्टीसमध्‍ये धवनने सहभाग घेवून फिटनेसबाबत घेण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नांना पूर्णविराम दिला.
पावसाचा व्‍यत्‍यय
सराव सामन्‍याचा दुसरा दिवस पावसाच्‍या व्‍यत्‍ययामुळे होऊ शकला नाही. सामन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी भारताने 4 विकेट गमावत 333 धावांवर आपला डाव घोषित केला होता.
दुस-या दिवशी झालेल्‍या पावसामुळे भारतीय क्रिकेटपटूंनी इनडोअर नेटप्रॅक्‍टीस केली. यामध्‍ये शिखर धवनसुध्‍दा सहभागी होता.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कुकच्‍या समर्थनार्थ धोनी मैदानात