आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shikhar Dhawan Superb Punjabi Mustache In Mohali Test Stumps Aussies

PHOTOS: 'मुछें हो तो नथ्‍थुलाल जैसी, वरना....!' खेळाडू आणि मिशांचे नाते जुनेच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍लीच्‍या शिखर धवनने पदार्पणाच्‍या सामन्‍यातच मोहालीचे पीसीए स्‍टेडिअम आपल्‍या फलंदाजीने दणाणून सोडले. आक्रमक फलंदाजीने त्‍याने आपण कसोटी क्रिकेटसाठीही एकदम फिट असल्‍याचे दाखवून दिले. मिचेल स्‍टार्कपासून पीटर सिडलसारख्‍या अव्‍वल गोलंदाजांची धुलाई करून त्‍याने कसोटीत इतिहासात वेगवान शतकाची नोंद केली. अवघ्‍या 85 चेंडूत 100 धावा करून त्‍याने आपल्‍या मिशीला तावात पीळ दिली.

आजच्‍या जमान्‍यात बहुतांश खेळाडू हे गुळगुळीत चेहरा ठेवणे पसंत करतात. अशावेळी धवनने राऊडी स्‍टाईल मिशा ठेऊन आपला मर्दाना अंदाज दाखवून दिला. सध्‍या विजयासाठी झगडणा-या ऑस्‍ट्रेलियन संघात पूर्वी मिशा राखलेले खेळाडू खूप प्रसिद्ध होते. डेनिस लिली, मर्व ह्यूज आणि डेव्हिड बूनसारखे खेळाडू आपल्‍या पीळदार मिशांसाठी ओळखले जात.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या पीळदार मिशीवाल्‍या खेळाडूंविषयी...