आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिव थापाचा आशियाई बॉक्सिंगमध्‍ये ‘गोल्डन पंच’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अम्मान - भारताच्या शिव थापाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ‘गोल्डन पंच’ मारला. त्याने 56 किलो वजनगटाचा अंतिम सामना जिंकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दुसरीकडे देवेंद्रो सिंग (49 कि.) व मनदीप जांग्राने (69 कि.) रौप्यपदक पटकावले. भारतीय संघाने आशियाई स्पर्धेत एकूण चार पदके जिंकली. यामध्ये एका सुवर्णासह दोन रौप्य व एका कांस्यपदकाचा समावेश आहे. राष्‍ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन मनोजकुमारने 64 किलो वजनगटात कांस्यपदक जिंकले.


19 वर्षीय शिव थापाने यजमान ओडाबा अल्काबेहचा पराभव केला. त्याने अंतिम लढतीत 2-1 ने विजय मिळवला. मात्र, दुसरीकडे देवेंद्रोला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. स्पर्धेतील 49 किलो वजनगटात कझाकिस्तानच्या तेमेर्तास झुस्सोपोवने अंतिम सामना जिंकला. तसेच मनदीपचाही फायनलमध्ये पराभव झाला.