आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivnaraine Chandarpaul Scores Hundred Against UP In Practice Match

सराव सामना : विंडीजविरुद्ध सामन्यात परविंदर ‘सिंह’ची डरकाळी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - परविंदर सिंहने (नाबाद 78) उत्तर प्रदेशला मोठ्या संकटातून बाहेर काढले. वेस्ट इंडीजविरुद्ध तीनदिवसीय सामन्यांत दुस-या दिवशी शुक्रवारी यजमानांनी 5 बाद 206 अशी मजल मारली.

मात्र विंडीजच्या पहिल्या डावातील धावांचा (466) विचार केला तर उत्तर प्रदेश अजूनही 260 धावांनी पिछाडीवर आहे. अजून पाच गडी शिल्लक आहेत. एकवेळ 96 धावांवरच यजमानांनी चार गडी गमावले होते. त्यानंतर परविंदरने प्रशांत गुप्ताच्या (39) साथीने डाव सावरला. पाचव्या गड्यासाठी दोघांनी 107 धावांची भागीदारी केली.

तन्मय श्रीवास्तव (23), मोहंमद कैफ (16), मुकुल डागर (42) आणि आरिश आलम (0) बाद झाल्याने उत्तर प्रदेशचा संघ संकटात सापडला होता. जम बसलेला गुप्ता खेळ संपायच्या थोडा वेळ आधी बाद झाला. परविंदरने 101 चेंडूंत नाबाद 78 धावा काढल्या. त्यात 11 चौकार, 2 षटकार होते. गुप्ताने 6 चौकार तर डागरने 74 चेंडूंत 8 चौकार लगावले.
विंडीजकडून डावखु-या वीरासामी पेरामॉलने दोन गडी टिपले.


चंद्रपॉलचे शतक
वेस्ट इंडीजने 4 बाद 333 वरून डाव सुरू केला. मात्र 133 धावांत त्यांचे उरलेले 6 गडी बाद झाले. पाहुण्यांचा पहिला डाव 466 धावांवर आटोपला. उत्तर प्रदेशकडून इम्तियाज अहमदने 117 धावांच्या मोबदल्यात 5 गडी टिपले. आर.पी. सिंहने तिघांना माघारी धाडले. पहिल्या दिवशी 91 धावांवर नाबाद असलेल्या चंद्रपॉलने शतक ठोकले. देवनारायण 93 धावांवर बाद झाला. या दोघांनाही अहमदने तंबूची वाट दाखवली. तळाला पेरामॉलच्या 46 व टीनो बेस्टच्या 35 धावांनी विंडीजच्या खेळात प्राण फुंकले.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज पहिला डाव : 466 (चंद्रपॉल 112, देवनारायण 94, पेरमौल 46*, 5/117 अहमद)
उत्तर प्रदेश पहिला डाव : ( मुकुल 42, परविंदर 78*, प्रशांत गुप्ता 39, 2/61 पेरमौल).