आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'DAY SPL: सोनाली बेंद्रे- दिया मिर्झाला पाहून मंदावत होता रावळपिंडी एक्सप्रेसचा वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्‍या वेगवान गोलंदाजीने भल्‍याभल्‍या फलंदाजांच्‍या तोंडचे पाणी पळवणारा रावळपिंडी एक्‍स्‍प्रेस अर्थात शोएब अख्‍तर आज (13 ऑगस्‍ट) आपला 37वा वाढदिवस साजरा करीत आहे. अमर्यादित वेग आणि वाद हे त्‍याच्‍या करिअरचे वैशिष्‍ट्य ठरले. 1997साली आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पर्दापण करणा-या अख्‍तरने करिअरमध्‍ये अनेक मैलाचे दगड पार केले. पाकिस्‍तानच्‍या इमरान खान, वकार युनूस, वासिम अक्रम या वेगवान गोलंदाजीची धुरा त्‍याने कायमच ठेवली नाही तर ती आणखी ठळक उंचीवर नेऊन पोचवली. त्‍याने वेगाने चेंडू टाकून जितके विक्रम केले. तितक्‍याच वादात तो अडकला. त्‍यामुळे त्‍याच्‍या जबरदस्‍त करिअरला वाद आणि दुखापत नावाचा डाग कायम राहिला. तोंडाने फटकळ असणा-या अख्‍तरने आपल्‍या बोलण्‍यानेही विनाकारण वाद निर्माण केले. मध्‍यंतरी त्‍याचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि दिया मिर्झाशीही जोडले गेले होते.


अख्‍तरने आपले आत्‍मचरित्र 'कॉन्‍फडियन्‍शली युअर्स' मध्‍ये चेंडू कुरतडल्‍याचे मान्‍य करून मोठा वाद निर्माण केला होता. तसेच सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड आपल्‍या गोलंदाजीला घाबरत असल्‍याचा दावाही त्‍याने यामध्‍ये केला होता. पुस्‍तक खपण्‍यासाठी त्‍याने हा वाद निर्माण केला असल्‍याचा आरोपही त्‍यावेळी त्‍याच्‍यावर झाला होता.

अख्‍तरने आपल्‍या कारकीर्दीत 46 कसोटीत 178, 163 वनडेमध्‍ये 247 तर 15 टी-20 सामन्‍यात त्‍याने 19 विकेट घेतल्‍या आहेत. बर्थडे बॉय शोएब अख्‍तरच्‍या वेग आणि वादांबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...