कराची- 38 वर्षाचा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने 20 वर्षाच्या मुलीशी केला विवाह. स्थानिक चॅनल दुनिया टीव्हीवर दाखवण्यात आलेले वृत्त खोटे असल्याचे पाकिस्तानच्या विवाह नोंदणी अधिका-याने सांगितले आहे.
हरिपूरच्या रजिस्ट्रारने हा खुलासा केला आहे. अख्तरचा विवाह अत्यंत साधेपणाने झाला होता. फोटो न मिळाल्यामुळे मिडीयामध्ये त्याच्या लग्नाचा चुकीचा फोटो छापण्यात आला.
पाकिस्तानी चॅनल दुनिया न्युज टीव्हीने त्या रजिस्ट्रारची मुलाखत प्रसारित केली आहे. मात्र रजिस्ट्रारचं नाव सांगितलं नाही.
माध्यमांच्या मते, शोएबने खैबर पश्तून ख्वाह प्रांतातल्या हरिपूरमध्ये रूबाब मुश्ताक नावाच्या मुलीशी विवाह केला. मागच्या 7 जूनला अख्तरचा विवाह ठरल्याची बातमी आली होती, ती त्याने नाकारली होती.
वरील व्हिडिओमध्ये रजिस्ट्रारची मुलाखत ऐकू शकता.
(फोटो- पाकिस्तानच्या निकाह रजिस्ट्रारने अख्तरच्या निकाहवर दिलेली साक्ष)
पुढच्या स्लाइड्वर वाचा, कोणत्या महिलेसोबत छापला गेला शोएब अख्तरच्या लग्नाचा खोटा फोटो...