माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याने खैबर पश्तूनखवा प्रांतातल्या हरिपूरच्या राहणाऱ्या रूबाब नावाच्या मूलीशी विवाह केला आहे. काही दिवसांपूर्वीमात्र शोएबने आपल्या विवाहाच्या बातम्या नाकारल्या होत्या.
एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या मते, बुधवारी जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या शोएबने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या रूबाबशी विवाह केला. रिपोर्ट्सच्या मते, शोएबकडून हक मेहरची रक्कम 5 लाखएवढी देण्यात आली. विवाह समारंभाला त्याचे आईवडीलसुद्धा उपस्थित होते.
पहिले केले होते खंडण
शोएबने याआधी ह्या बातमीची सत्यता नाकारली होती. सोशल मिडीयावर त्याने असे वक्तव्य केले होते की, तो त्याच्या आईवडीलांना पसंत असलेल्या मुलीशीच विवाह करेल. त्याचे वय आता 38 वर्षे आहे. करीबी सुत्रांच्या मते, त्याने आतामात्र विवाहाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. सुत्रांनी सांगितले की, हा वेगवान गोलंदाज आणि त्याचे कुटूंबीय 12 जून रोजी मुलीच्या घरी गेले होते. तिथेच विवाहाची पुढची बोलणी झाली.
ट्वीटरवर मिळत आहेत शुभेच्छा
त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर शेकडो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तरी अजून शोएबने कोणत्याच चाहत्यांना उत्तर दिले नाहीये.
पुढच्या स्लाइड्सवर क्लिक करून पहा, शोएबचे काही ट्वीटस्