आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भज्जी-युवीला मारहाण केल्याबाबत PAK क्रिकेटरने दिले उत्तर, पाहा काय म्हणाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरभजन सिंग आणि शोएब अख्तर - Divya Marathi
हरभजन सिंग आणि शोएब अख्तर
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांना मारहाण केल्याबाबतचे वृत्त पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने फेटाळून लावले आहे. या घटनेबाबत खूप खूप हसत बोलताना शोएब म्हणाला, ही घटना मला वाटते 2004 ची असावी. भज्जीने ही घटना खूपच मनावर घेतलेली दिसते. त्या संपूर्ण घटनेचा केला खुलासा...
- शोएब अख्तरने त्या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ही घटना 2004 सालची आहे.
- तेव्हा भारत-पाकिस्तान संघात रावळपिंडीत कसोटी सुरु होती. मात्र ती मारहाण नव्हती तर चेष्टेने आमच्यात मस्ती सुरु होती.
- आम्ही सर्व हॉटेलच्या खोलीत बसून मस्ती करायचो. तेथे आम्ही आर्म रेसलिंग सुद्धा करायचो. मात्र, त्यात सीरियस असे काहीही नसायचे.
- भज्जी आणि युवी मला छोट्या भावासारखे आहेत. मी त्यांना मारहाण करण्याबाबत कधी विचार पण करू शकत नाही.
- भारतीय क्रिकेटपटूसोबत मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही शत्रुत्त्वाने वागलो नाही.
- आम्ही सर्व एकत्र मस्ती करायचो. एक-दूस-याच्या रूममध्ये जायचो व एकत्र जेवायचोसुद्धा.
- जर आम्ही चांगलो मित्र होतो तर त्यांना मारहाण कशी करू शकतो.
काय म्हटले होते भज्जीने-
- एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हरभजन सिंगने म्हटले होते की, ‘शोएबने एकदा युवीला पकडू- पकडून खोलीत एकदा खूप मारले होते.
- आम्ही जेव्हा त्याला पकडायला जायचो तेव्हा तो आम्हाला ऐकत नसत. तो इतका तगडा व ताकदवान होता की आम्ही तिघे-तिघे जरी त्याला पकडायचे म्हटले तरी तो निसटून जायचा. तो आमच्या हाताला कधीच लागायचा नाही.
- एकदास तर शोएबने युवीला उचलून फेकले होते. त्यावेळी युवी माझ्यापेक्षा डबल होता. युवीची ती अवस्था पाहून मी तर घाबरलो होतो. शोएब आला की मी रूमच्या कोप-यात जावून बसायचो.
- दरम्यान, युवीने हे सांगितले की, शोएब अख्तरसोबत त्याची खूपच चांगली मैत्री राहिली आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, पाकिस्तानी क्रिकेटर्सबाबत मुलाखतीत काय म्हणाला हरभजन सिंग...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...