आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हिना देशाचे नाव उंचावणार’, प्रशिक्षक चंदेल यांना विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - जगातील नंबर वन नेमबाज हिना सिद्धू देशाला सन्मान मिळवून देईल. देशाचे नाव उंचावण्यासाठी तिने आता सुरुवात केली आहे, असा विश्वास प्रशिक्षक दिलीपसिंग चंदेल यांनी व्यक्त केला. गतवर्षी झालेल्या वर्ल्डकप शूटिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती हिना एअर पिस्तूलमध्ये जगातील नंबर वन नेमबाज ठरली. हिनाच्या कामगिरीबद्दल प्रशिक्षक चंदेल यांनी ही माहिती दिली.
परिपूर्ण आत्मविश्वास : फायनलमध्ये हिना तणावमुक्त आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असल्यासारखी राहते. तिचे हे वागणे इतरांपेक्षा वेगळे आहे. पहिल्या फेरीसारखेच हिना फायनलमध्येही खेळते. यातूनच तिला अचूक नेम साधता येतो.
दिग्गजांना हिनाची भीती : वैशिष्ट्यपूर्ण खेळीमुळे हिनाची दिग्गज नेमबाजांनाही भीती वाटते. ‘शोल्डर लॉक’हे त्यातील खास आहे. नेमबाजासाठी सामान्यपणे शोल्डर लॉक करून नेम साधणे कठीण जाते. मात्र, हिनाने हे तंत्र यशस्वीपणे आत्मसात केले आहे. गतवर्षी हिनाने वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदक पटकावले. आता या पदकावरचे वर्चस्व कायम ठेवण्याचे तिच्यासमोर येत्या जुलैमध्ये मोठे आव्हान आहे.
हिनाचा पतीही नेमबाज
लुधियानाची 24 वर्षीय हिना आंतरराष्ट्रीय नेमबाज रौनक पंडितसोबत विवाहबद्ध झाली. हे दांपत्य मुंबईत राहते. हिना ही मूळची पंजाबमधील आहे.